Monday, 13 May 2019

सॅमसंगद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच




 भारतातील स्मार्टफोन कंपन्यांमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत आहे. प्रत्येक कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन ऑफर घेऊन येत आहे. नव्याने लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये फिचर्स, मेमरी, स्टोअरेज, कॅमेरा यातील विविध पर्यायामुळे स्मार्टफोन आणखी स्मार्ट होतायतसध्या बाजारात नवीन लाँच होणाऱ्या स्मार्टफोनमध्ये सेल्फी कॅमेरा किंवा रिअर कॅमेरा किती मेगापिक्सलाचा आहे? याबाबत सर्वाधिक चर्चा होते. हेच लक्षात घेऊन सॅमसंगद्वारे 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन लाँच केला जाणार आहे.
सॅमसंग या नामांकित स्मार्टफोन कंपनीद्वारे अवघ्या काही दिवसांपूर्वी गॅलेक्सी A सीरिजचा A-70 हा स्मार्टफोन लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आता सॅमसंग कंपनीने नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे कमी उजेडात या कॅमेराद्वारे ऑटोमेटिक पद्धतीने 16 मेगापिक्सलपर्यंत फोटो घेता येणार आहे. या नवीन स्मार्टफोनमध्ये फोटोग्राफीसाठी 64 मेगापिक्सल  ISOCELL Bright GW1 सेन्सरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात 100dB पर्यंत रिअलटाईम आणि HDR सपोर्टही देण्यात येणार आहे.
आतापर्यंत सोनी कंपनीच्या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे. सोनी कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये टक्कर म्हणून सॅमसंगच्या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात येणार आहे.
सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, या नव्या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल कन्व्हर्जन सेन्सर देण्यात येणार आहे. या सेन्सरमुळे फोटो क्लिअर येतील. तसेच फोटो काढताना होणार आवाजही येणार नाही. त्याशिवाय या स्मार्टफोनमधील कॅमेऱ्यात हाय परफोर्मन्स फेस डिटेक्शन, ऑटोफोकस टेक्नोलॉजी, फुल एचड़ी सपोर्ट देण्यात येणार आहे. विशेष म्हणजेच या कॅमेऱ्यातील सेन्सरद्वारे 480 फ्रेम प्रति सेकंद वेगात स्लो मोशन व्हिडीओ काढता येतील. सॅमसंगच्या कोणत्या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा असणार? या फोनची किंमत किती असणार? याबाबत मात्र कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


'मोटोरोला वन व्हिजन' १५ मे रोजी लाँच करणार आहे





मोटोरोला आपला नवा मोबाइल 'मोटोरोला वन व्हिजन' १५ मे रोजी लाँच करणार आहे. या फोनबाबतची अनेक माहिती समोर आल्या होत्या. आता लाँचिंग पूर्वी फोनची वैशिष्ट्ये आणि किंमत किती असेल याची माहिती समोर आली आहे. 

फोनची ऑनलाइन माहिती लीक लाँचपूर्वीच जाणून घ्या 'मोटोरोला वन व्हिजन'ची वैशिष्ट्ये.

या स्मार्टफोनमध्ये 'पंच होल डिस्प्ले' असणार आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये ४८ मेगापिक्सलचा ड्युल लेंस कॅमेरा असणार आहे. सेल्फीसाठी फ्रंट कॅमेरा हा २५ मेगापिक्सलचा असणार आहे. फिंगरप्रिंट सेंसर फोनच्या बॅक पॅनलमध्ये असणार आहे. फोनमध्ये ६.३ इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असणार आहे. त्याशिवाय फोनमध्ये इक्सिनोस ९६०९ चिपसेट असणार आहे. फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज असू शकतो. मोटोरोलाच्या या फोनची बॅटरी क्षमता ३५०० एमएएच इतकी आहे. फोनमध्ये अॅण्ड्राइड ९ पाई ओएस असणार आहे. स्मार्टफोनमध्ये ड्युल सीम, ब्लू टूथ व्ही ५, वायफाय ८०२.११ एसी, एनएफसी, युएसबी टाइप सी पोर्ट, हेडफोन जॅक असणार आहे. 

फोनची किंमत
'मोटोरोला वन व्हिजन'ची किंमत जवळपास २९९ युरो म्हणजे जवळपास २३ हजार ४०० रुपये असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन १५ मे रोजी ब्राझीलमध्ये लाँच होणार आहे. 

I-pod याची किंमत आहे तब्बल १४ लाख रुपये



तुम्हाला जुना एमपी ३ खरेदी करण्याची संधी मिळाली तर. किती रुपयांना खरेदी करू शकता? कदाचित जुनी वस्तू म्हणून तुम्ही खरेदी करणार नाहीत. जुन्या गोष्टी कशाला जवळ म्हणून तुम्ही नाकारू शकता. पण, 'जुनं ते सोनं' या म्हणीप्रमाणे १८ वर्ष जुन्या आयपॉडची विक्री करण्यात येत आहे. याची किंमत आहे तब्बल १४ लाख रुपये. विशेष म्हणजे हा आयपॉड ओरिजिनल बॉक्समध्ये असून त्याची पॅकिंग तशीच आहे.

फर्स्ट जनरेशनमधील हा आयपॉड ई-कॉमर्स साइट eBay वर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. याची किंमत २० हजार डॉलर म्हणजे जवळपास १४ लाख रुपये आहे. ऑक्टोबर २००१ मध्ये स्टीव्ह जॉब्सने, तुमच्या पॉकेटमध्ये १००० गाणी, असं म्हणत आयपॉड लाँच केला होता. या १४ लाखांच्या आयपॉडमध्ये ५ जीबी हार्डड्राइव्ह, दोन इंचाची एलसीडी स्क्रीन आणि एक स्क्रॉल व्हील आहे. त्याशिवाय आयपॉडला १० तासांचा बॅटरी बॅकअप आहे. 

१४ लाख रुपयांना विक्री करण्यामागे दोन कारणे असल्याची चर्चा आहे. त्यापैकी एक कारण म्हणजे, हा आयपॉड १८ वर्ष जुनं असून आयपॉड जवळ असणे हे आधुनिक असल्याचे समजले जायचे. दुसरे कारण म्हणजे, आयपॉड हे अॅपलच्या सुरुवातीच्या काळातील महत्त्वाचे डिव्हाइस आहे. त्यामुळे अॅपलचा चाहता आपल्या वैयक्तिक संग्रहात आयपॉडचा समावेश असावा अशी इच्छा बाळगणारा असेल. आयपॉडला ३९९ डॉलर म्हणजे जवळपास २८ हजार रुपयांच्या किंमतीवर लाँच करण्यात आले होते. 

आयपॉड हा त्यावेळी अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला होता. या आयपॉडने बदलत्या काळात वॉकमनची जागा घेतली होती. सध्याच्या काळी स्मार्टफोनमुळे आयपॉड इतके लोकप्रिय नाही. त्याशिवाय अॅपल आता केवळ एक आयपॉड डिव्हाइस आयपॉड टचची विक्री करण्यात येते. या सीरिजच्या डिव्हाइजचे उत्पादन २०१७ रोजी बंद करण्यात आले आहेत.

Samsung फोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता








Samsung कंपनीने आपल्या दोन स्मार्टफोनच्या किमती कमी केल्या आहेत. Samsung Galaxy A7 (2018) आणि Galaxy A9 (2018) हे दोन फोन तुम्ही अगदी स्वस्तात खरेदी करू शकता. Samsung A7 चं 4GB व्हेरिएंट 15,900 रुपयाला, तर 6GBचं व्हेरिएंट 19,900 रुपयाला तुम्हाला ऑनलाईन खरेदी करता येईल.

Samsung A9(2018) बद्दल सांगायचं झालं तर याचं 6GB128GB व्हेरिएंट ज्याची मुळ किंमत 28,990 रुपये आहे ते तुम्हाला 25,990 रुपयांत खरेदी करता येईल. तर याच मोबाइलचं 8GB 128GB हे व्हेरिएंट ज्याची मुळ किंमत 31,990 रुपये आहे ते तुम्हाला 28,990 रुपयात खरेदी करता येईल. सॅमसंगचा A9 हा फोन जेव्हा लाँच झाला होता तेव्हा त्याची किंमत 36,990 रुपये होती.  याचाच अर्थ सॅमसंगचं 6GB हे व्हेरिएंट तुम्हाला 11 हजार रुपयांनी स्वस्तात खरेदी करता येईल. ही ऑफर फक्त 31 मे पर्यंतच असल्याचं सॅमसंगने म्हटलं आहे.

Samsung Galaxy A7 (2018) चे फीचर्स या फोनमध्ये 6 इंचाचा FHD Super AMOLED इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचं पिक्सेल रिझोल्यूशन 1080 x 2220 असं आहे. हा फोन 2.2 GHz ऑक्टाकोर 7885 प्रोसेसरवर काम करतो. कॅमेऱ्याबाबत सांगायचं झालं तर, या फोनच्या कॅमेऱ्याने वाइड एँगल फ्रेममध्ये तुम्ही फोटो काढू शकाल. रियर कॅमेरा सेटअपमध्ये 24 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 8 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. तुम्ही या फोनद्वारे स्लो मोशन व्हिडिओ रेकॉर्डीगसुद्धा करू शकता. या फोनचा फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सलचा आहे.
Samsung Galaxy A9 ये फीचर्स या फोनमध्ये 6.3 इंचाचा FHD डिस्प्ले देण्यात आला आहे. क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 या प्रोसेसरवर हा फोन काम करतो.  या फोनमध्ये अँड्रॉइड 8.1 ओरियो ही OS असून 3800 mAh ची बॅटरी त्यात बसवण्यात आली आहे. यात तुम्ही एकाच वेळेस 320 मुव्हीज स्टोअर करू शकता. Galaxy A9 ची विशेषता म्हणजे यात 4 कॅमेरे आहेत. रियरमध्ये 24MP चा प्रायमरी, 10MP चा टेलीफोटो लेंससह 2X ऑप्टिकल झूम, आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड 120 डिग्री लेंस आणि डेप्थ इफेक्टसाठी 5MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या मोबाइलचा फ्रंट कॅमेरा 24 मेगापिक्सलचा आहे.